ज्यांच्या त्यागातून नवी मुंबईची निर्मिती झाली त्या प्रकल्पग्रस्तांच्या
पाल्यांना विनाविलंब विद्यावेतन सुरुच झाले पाहिजे
आमदार संदीप नाईक यांची मागणी
स्थानिकांच्याबांधकामांनासंरक्षणदेण्यासाठीसर्व्हेक्षणपूर्णकरा

प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली आहे. त्यांच्या पाल्यांना दिले जाणारे विद्यावेतन थांबवून सिडकोने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच अंधारात ढकलले आहे. हे विद्यावेतन तातडीने सुरु करा. प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाई त्वरीत थांबवून सिडकोमार्फत जे सर्व्हेक्षणाचे काम केले जात आहे ते कारवाईसाठी नसून या बांधकामांना संरक्षण देण्यासाठी व्हायला....
   

चित्ररथाच्या माध्यमातून वृक्षलागवडीची जनजागृती
राज्म शासनाच्या वतीने २०१७ मध्मे राज्मात ४ कोटी वृक्ष लागवड होणार आहे. वृक्षलागवडीचे महत्व सांगण्यासाठी चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून नवी मुंबईत या चित्ररथाचे मंगळवारी आगमन झाले होते.
ऐरोली येथे या चित्ररथाचे स्वागत आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, कोळी समाजाचे नेते चंदू पाटील, वन अधिकारी उपस्थित होते. ...

   
ग्रीनहोपसंस्थेच्यावतीनेमोफतवृक्षरोपांचेवाटप
पर्यावरण संवर्धनात भरीव काम करणार्‍या ग्रीन होप या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने पर्यावरणप्रेमी नागरिक आणि संस्थांना सालाबादप्रमाणे या वर्षी देखील मोफत वृक्षरोपांचे वितरण करण्यात येणार आहे.
ग्रीन होप संस्थेच्या वतीने दरवर्षी नवी मुंबईत जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचे कार्यक्रम विधिध ठिकाणी आयोजित केले जातात. यावर्षी नेरुळ, कोपरखैरणे आणि ऐरोलीत कार्यक्रम पार पडले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती जनजागृती करण्यासाठी निबंध, चित्रकला इत्यादी स्पर्धाचे आयोजन...
 
   
विजेच्या समस्या १०० टक्के दूर करा आमदार संदीप नाईक यांची मागणी
महावितरणच्या मुख्य अभियंत्यांची घेतली भेट

गेल्या काही दिवसात नवी मुंबईतील विविध भागात खंडीत होणारा वीजपुरवठा या आणि इतर महत्वाच्या वीज समस्यांची सोडवणूक करा, या मागणीसाठी शुक्रवारी आमदार संदीप नाईक यांनी महावितरणच्या भांडूप परिमंडळाच्या मुख्य अभियंत्या पुष्पा चव्हाण यांची वाशी येथील महावितरणच्या कार्यालयात भेट घेतली. वीज समस्या १०० टक्के नाहिशा करुन नागरिकांचे समाधान करावे, असे त्यांनी चव्हाण यांना सूचित केले. वीज उपकरणे दुरुस्तीची कामे पूर्ण करुन कर्मचारी भरतीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्य अभियंत्या चव्हाण यांनी याप्रसंगी आमदार नाईक यांना दिले.
   
ग्रीन होप संस्थेच्यावतीने पर्यावरणदिनी वृक्षारोपण
पर्यावरण संरक्षणाची घेतली शपथ

ग्रीन होप या पर्यावरणप्रेमी संस्थेच्यावतीने जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने सोमवारी शहरात तीन ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या सदस्यांनी आणि नागरिकांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
कोपरखैरणेतील निसर्गउद्यान परिसरात वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसच
   

ऐरोलीतील जैवविविधता केंद्राला जागतिक दर्जाचे बनवा|
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ऐरोली दिवा खाडीनजीक विकसित करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या सागरी व किनारी जैव विविधता केंद्राचे उद्घाटन रविवारी पार पडले. याप्रसंगी आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, कांदळवन विभागाचे मुख्य संवर्धक एन. वासुदेवन, वन विभागाचे सचिव विकास खरगे, ए के मिस्त्री, ज्यांच्या सल्ल्याने या केंद्राची निर्मिती करण्यात आली त्या जर्मन कंपनीचे जीआयएफचे मुख्य अधिकारी मायकेल वकिली, कांदळवन संरक्षक अधिकारी मधुकर घोडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते....

 
नवी मुंबईत कबड्डीच्या स्टेडियमसाठी प्रयत्नशील -आमदारसंदीपनाईक
देशी खेळ असलेल्या कबडडीच्या सरावासाठी तसेच सामन्यांच्या आयोजनासाठी खास स्टेडियम निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती नवी मुंबई कबड्डी लीगचे अध्यक्ष आमदार संदीप नाईक यांनी दिली आहे. सलग दुसर्‍या वर्षी नवी मुंबईत नवी मुंबई कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १३ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात सायंकाळी ५ ते रात्री ११ यावेळेत करण्यात आले आहे. या वर्षी पुरुषांचे एकूण ८ संघ असून दोन संघांची यावर्षी वाढ झाली आहे...

 
ऐरोली-डोंबिवली मार्गाकरीता मंजुर्‍यांचे काम प्रगतीपथावर
आमदार संदीप नाईक यांच्या प्रश्‍नाला मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर

नवी मुंबईतील नागरिकांना थेट डोंबिवली आणि डोंबिवलीतील नागरिकांना थेट नवी मुंबईत प्रवास करता यावा यासाठी प्रस्तावित ठाणे- बेलापूर ऐरोली ते डोंबिवली उन्नत मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, यासाठी आमदार संदीप नाईक शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. सदरच्या मार्गाचे काम प्रत्यक्षात कधी सुरु होणार आहे? असा लेखी प्रश्‍न अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले असून या मार्गासाठी लागणार्‍या विविध मंजुर्‍या घेण्याचे तसेच इतर अनुशंगिक कामे ....

 
नेरुळ येथे आरटीओ कार्यालय इमारतीच्या अंदाजपत्रकास मंजुरी
आमदार संदीप नाईक यांच्या प्रश्‍नाला शासनाचे उत्तर

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अपुर्‍या जागेत सध्या नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाचा (आरटीओ) कारभार सुरु आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सिडकोने आरटीओला दिलेल्या भुखंडावर नेरुळ येथे नविन कार्यालय केव्हां बांधण्यात येणार आहे? असा प्रश्‍न आमदार संदीप नाईक यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचारला होता.
___________________________________________________________________________________________________________
नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या सराव परिक्षेमुळे मुख्य परिक्षेत विद्यार्थ्यांना धवल यश
लोकनेते गणेश नाईक यांचे कौतुकोदगार

नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या एस.एस.सी.च्या सराव परिक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील मुख्य परिक्षेची भिती नाहिशी होवून आत्मविश्‍वास निर्माण होतो आणि मुख्य परिक्षेच्या निकालात अधिक चांगले यश प्राप्त होते, असे कौतुकोदगार लोकनेते गणेश नाईक यांनी काढले आहेत.
___________________________________________________________________________________________________________
समुहविकास योजनेच्या नविन अधिसूचनेत ग्रामस्थांच्या सुचनांचा अंतर्भाव करावा ग्रामस्थांची घरे आणि धार्मिक स्थळांना दिलेल्या नोटीसा तातडीने मागे घ्याव्यात आमदार संदीप नाईक यांनी मांडली लक्षवेधी सुचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नवी मुंबईच्या निर्मितीसाठी ग्रामस्थांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने सिडकोला दिल्या. त्या ग्रामस्थांच्या सुचनांचा अंतर्भाव समुह विकास योजनेच्या नविन अधिसूचनेत करावा, अशी मागणी आज आमदार संदीप नाईक यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून विधीमंडळ अधिवेशनात केली. त्याचबरोबर शासनाने आश्‍वासित करुनही ग्रामस्थांची घरे आणि धार्मिक स्थळांना नोटीसा देण्यात येत आहेत या नोटीसा....

___________________________________________________________________________________________________________
नवी मुंबई पालिका प्रभाग समित्यांवरील आणि सिडको कंडोमिनियमअंतर्गत कामांवरील बंदी उठवावी
आमदार संदीप नाईक यांची औचित्याच्या मुद्याद्धारे मागणी

आमदार संदीप नाईक यांनी शुक्रवारी विधानसभेत नवी मुंबईचे दोन महत्वाचे विषय औचित्याच्या मुद्याद्धारे विधानसभा अधिवेशनात मांडले. नवी मुंंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांवरील बंदी उठवावी तसेच सिडको वसाहती (कंडोमिनियम)अंतर्गत कामे करण्यास पालिकेला शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली....

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या शासन धोरणात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि दिघावासियांचा समावेश हवाच
आमदारसंदीपनाईकयांचीविधानसभेतमागणी

राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केलेल्या राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या धोरणात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची आणि दिघावासियांची गरजेपोटीच्या बांधकामांचा समावेश व्हायलाच पाहिजे, अशी जोरदार मागणी आमदार संदीप नाईक यांनी आज विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत केली.दिघ्यातील एमआयडीसीच्या जागेवरील सर्वसामान्यांच्या बांधकांमांविषयी आमदार संदीप नाईक यांनी मांडलेली लक्षवेधी सूचना आज विधानसभा सभागृहात चर्चेला आली......
___________________________________________________________________________________________________________
दिघावासिय आणि प्रकल्पग्रस्तांसाठी आमदार संदीप नाईक यांचे आंदोलन
विधानभवनआवारातनिदर्शने

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी तसेच दिघा येथील सर्वसामान्यांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करावीत, या मागणीसाठी आमदार संदीप नाईक यांनी आज विधानसभा आवारात विरोधी पक्षाच्या आमदारांसह सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.
सिडकोने वेळोवेळी गावठाण सर्व्हेक्षण केले नाही. काळाच्या ओघात प्रकल्पग्रस्तांची कुटुंब वाढली. त्यामुळे राहण्यासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी त्यांनी गरजेपोटी घरांचा विस्तार केला. आजपर्यतची ही बांधकामे नियमित करावीत आणि ग्रामस्थांच्य

___________________________________________________________________________________________________________
कोपरखैरणे ते विक्रोळी पुलाचे काम लवकरच सुरु होणार
तुर्भ्यातील जनता मार्केटकडे जाण्यासाठी स्कायवॉक
आमदारसंदीपनाईकयांचापाठपुराव्याचेफलित

पायाभूत सुविधांमुळे शहरविकासाला गती मिळत असते. नवी मुंबईत दळणवळणाच्या सोयी निर्माण व्हाव्यात यासाठी आमदार संदीप नाईक हे सातत्याने शासकीय पातळीवर पाठपुरावा करीत असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे कोपरखैरणे ते विक्रोळी या पुलाच्या कामास गती मिळाली असून हे काम लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे.त्याचबरोबरदोनरेल्वेस्थानकांच्यामध्येअसलेल्यातुर्भेतीलप्रसिध्दअशाजनतामार्केटकड

___________________________________________________________________________________________________________
नेरुळ ते नविन भाऊ चा धक्का प्रवासी जलवाहतूक सुरु होणार
ठाणे जिल्हयातील जलवाहतूकीसाठी शासन सकारात्मक
आमदारसंदीपनाईकयांच्यापाठपूराव्यालायश

नवी मुंबईतील नेरुळ ते मुंबईतील नविन भाऊ चा धक्का या दरम्यान लवकरच प्रवासी जलवाहतूक सूरु होणार असून ठाणे जिल्हयातील शहरांना जलवाहतूकीने जोडण्यासाठी सर्वेक्षण करुन ही सेवा देखील सुरु करण्यात राज्य शासनाने सकारात्मक भुमिका घेतली आहे. आमदार संदीप नाईक यांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान आज विधानसभेमध्ये या संदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी दिलेले लेखी उत्तर आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या तोंडी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.
___________________________________________________________________________________________________________
गावठाण आणि दिघ्याबाबत लवकरच निर्णय
आमदार संदीप नाईक यांच्या मागणीवर नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांचे सकारात्मक उत्तर

नवी मुंबईतील गावठाणांतील तसेच दिघा येथील बांधकामांविषयी लवकरच निर्णय घेवू, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी आमदार संदीप नाईक यांच्या नगरविकास खात्याच्या पुरवणी मागणीवर उत्तर देताना दिली. नगरविकास खात्याच्या पुरवणी मागण्यांसदर्भात आज पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत सुरु असलेल्या चर्चेत भाग घेत आमदार नाईक यांनी गावठाण आणि दिघ्याचा विषय मांडला....
___________________________________________________________________________________________________________
कारवार्ई थांबवा, प्रकल्पग्रस्त आणि दिघावासियांच्या हिताची योजना आणा
आमदार संदीप नाईक यांनी औचित्याचा मुद्दा मांडून विधानसभेत जोरदार मागणी केली.

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आणि दिघा येथील पिडीत रहिवाशांच्या हिताची योजना तात्काळ आणावी आणि तोपर्यंत या रहिवाशांच्या बांधकामावर सुरू असलेली कारवाई त्वरीत थांबवावी, अशी जोरदार मागणी आ. संदीप नाईक यांनी पावसाळी अधिवेशना दरम्यान आज औचित्याच्या मुद्याद्व्रारे विधानसभेमध्ये केली....
___________________________________________________________________________________________________________
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठीआमदार संदीप नाईक यांचे आंदोलन
नवीमुंबईबंदचाआवाजविधानभवनातकेलाबुलंद

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी आमदार संदीप नाईक हे विधानसभेत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सिडको आणि महापालिका प्रकल्पग्रस्तांच्या वडीलोपार्जीत बांधकामांवर करीत असलेल्या कारवाईविरोधात सोमवारी प्रकल्पग्रस्त आणि इतर घटकांनी शहरात कडकडीत बंद पाळला. सोमवारीच राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनही सुरु झाले...

___________________________________________________________________________________________________________
महावितरणने यापुढे कारभार सुधारला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु
- ‘जनसंवाद’ उपक्रमामध्ये आ.संदीप नाईक यांचा इशारा
- कोपरखैरणेवासीयांचा जनसंवाद उपक्रमाला भरगच्च प्रतिसाद
- उद्याने आणि विरंगुळा केंद्र, बीटचौकी, सीसीटीव्हीसाठी आमदार निधी देणार
- ४०० लेखी निवेदने सादर
कोपरखैरणे विभागासाठी आज (ता.१०) झालेल्या आ.संदीप नाईक यांच्या लोकहितवादी ‘जनसंवाद’ उपक्रमास नागरिकांची उत्स्फूर्त आणि भरगच्च उपस्थिती लाभली. नागरिकांनी विविध विषयांवरील आपल्या लेखी समस्या यावेळी मांडल्या. महावितरण..
___________________________________________________________________________________________________________
सुलाईदेवी बनते प्रेक्षणीय पर्यटन स्थळ
तीन बंधाऱ्यांचे काम पूर्ण
नवी मुंबईतील स्थानिकांच्या धार्मिक श्रद्धेचे परंपरागत ठिकाण असलेले राबले एम.आय.डी.सी तील सुलाईदेवी हा निसर्ग संपन्न परिसर प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनत आहे.पर्यावरणाशी सुसंगत अशी कामे या ठिकाणी नवी मुंबई मागणंगपालिका, वन विभाग आणि आमदार संदीप नाईक यांच्या आमदार विकास निधीमधून सुरू आहेत. आमदार नाईक यांनी आज या परिसराचा पाहणी दौरा केला. आणि या ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. निर्सगाने भरभरून वनसंपदा दिलेल्या असा....
___________________________________________________________________________________________________________
सर्वसामान्यांना दिले जाणारे रेशनिंगचे धान्य निकृष्ट दर्जाचे, किडे पडलेले
आमदार संदीप नाईक यांनी केला पर्दाफाश
धान्याच्या गोदामांना दिली अचानक भेट
सर्वसामान्य नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारतर्फे दिले जाणारे रेशनिंगचे धान्य कशा प्रकारे दर्जाहीन आणि सडलेल्या अवस्थेत आहे. त्याचा पर्दाफाश आमदार संदीप नाईक यांनी तुर्भे येथील केंद्रीय वखार मंडळाच्या गोदामांना अचानक दिलेल्या भेटी दरम्यान झाला आहे.
___________________________________________________________________________________________________________
वीज समस्या सोडविल्या नाहीत तर रस्त्यावर उतरू
आमदार संदीप नाईक यांचा महावितरणला इशारा
भाजपाचे सरकार आल्यानंतर वाढीव बिलाने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच नवी मुंबई शहरामध्ये मोठया प्रमाणावर विजेच्या समस्या असून अघोषित भर नियमनाचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. महावितरणने भेडसाविणार्‍या समस्या तातडीने न सोडविल्यास रस्त्यावर उतरून महावितरण विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे. आज(ता.२१) मंगळवारी आ.नाईक यांच्या नेतृत्वाखाली...
___________________________________________________________________________________________________________
नवी मुंबईच्या विकासात मुस्लिम धर्मियांचे मोठे योगदान
लोकनेते गणेश नाईक यांचे गौरवोद्गार

नवी मुंबईच्या आजवरच्या विकासात येथील मुस्लिम धर्मियांचे मोठे योगदान राहिले आहे. असे गौरवोद्गार लोकनेते गणेश नाईक यांनी आज (सोमवारी) कोपरखैरणे येथे झालेल्या रोजा इफ्तार दावत प्रसंगी काढले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कोपरखैरणे मुस्लिम समाज आणि नगरसेवक मुनावर पटेल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शेतकरी समाज सभागृहात पार पडला. ंडले.त्याला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव....
___________________________________________________________________________________________________________
प्रत्येकाने एक तरी झाड लावावे
आमदार संदीप नाईक यांचे पर्यावरणदिनी आवाहन
प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावून ते जगवावे आणि पर्यावरण रक्षणात आपला हातभार लावावा, असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांना केले.
आमदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन होप या स्वयंसेवी संस्थेने नवी मुंबईत निसर्ग संवर्धन आणि वृक्षारोपणाची मोठी मोहिम उभी केली आहे. ग्रीन होप, ऐरोली सेक्टर १९ मधील नेवा गार्डन रहिवासी, हरिओम जॉगर्स ग्रुप आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेवा गार्डन येथे आमदार नाईक यांच्या हस्ते पर्यावरणदिनाचेऔचित्य साधून खारफुटीचे रोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.  त्याप्रसंगी आमदार नाईक यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्व......
___________________________________________________________________________________________________________
शिधावाटपच्या गोदामांना भेटी देणार
आमदार संदीप नाईक यांची माहिती
शिधावाटप विभागाच्या दक्षता समितीच्या सदस्यांची मासिक सभा आज दिनांक ३० मे रोजी सकाळी समितीचे उपाध्यक्ष आमदार संदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शिधावाटपच्या वाशी कार्यालयात पार पडली. समितीचे सचिव आणि शिधावाटप अधिकारी एस.आर.कोळी यावेळी उपस्थित होते......
.
___________________________________________________________________________________________________________
तेरापंथ युवक परिषदेने सेवाभाव जपावा
आ. संदीप नाईक यांचे प्रतिपादन; ऐरोली येथे आचार्य तुलसी डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन

आज या धकाधकीच्या जीवनात मनुष्य हा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत चालला आहे. शिवाय आरोग्यविषयक सुविधांचा बाजार बनत चालला आहे. मात्र तेरापंथ युवक परिषदेच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या डायग्नोस्टिक सेंटरने नागरीकांना परवडेल अशा स्वरुपात सेवा द्यावी व अशा प्रकारे सेवा जपतानाच अनेक शाखा आपण नवी मुंबईत निर्माण कराव्यात असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी येथे केले.
___________________________________________________________________________________________________________
कबडडीसाठी स्वतंत्र मैदाने उपलब्ध करणार
आमदार संदीप नाईक यांची ग्वाही
नवी मुंबई कबडडी लिगचे दणक्यात उदघाटन

आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते आज बहुचर्चित नवी मुंबई कबडडी लिगचे एका नेत्रदिपक सोहळयात उदघाटन झाले. कबडडी खेळासाठी आणि स्पर्धेकरीता नवी मुंबईत स्वतंत्र मैदाने उपलब्ध करु, अशी ग्वाही लिगचे अध्यक्ष आमदार संदीप नाईक यांनी दिली.
कोपरखैरणेच्या सेक्टर ८मधील रा.फ.नाईक विद्यालयाच्या मैदानात जिल्हा कबडडी असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा १७ एप्रिलपर्यंत रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत रंगणार आहेत.

___________________________________________________________________________________________________________
घरे तोडतात ते मने काय जोडणार
आमदार जितेंद्र आव्हाड यांचा विरोधकांवर घणाघात

आपल्या हस्तकांकरवी सर्वसामान्यांची घरे तोडण्यासाठी न्यायालयात जाणारे जनतेची मने काय जोडणार? असा जोरदार घणाघात करीत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक ६ यादवनगरच्या पोटनिवडणुकीच्या आजच्या प्रचारसभेत विरोधकांचे पुरते वस्त्रहरण केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार संध्या यादव यांच्या प्रचार सभेत आज स्थानिक रहिवाशांनी तुफान गर्दी केली होती.

___________________________________________________________________________________________________________
मेक इन महाराष्ट्र करताना प्रकल्पग्रस्स्तांननाही न्याय मिळावा
विधीमंडळ अर्थसंकल्पीय चर्चेमध्ये आमदार संदीप नाईक यांची मागणी
दिघा एमआयडीसीतील बांधकामे मानवीय दृष्टीकोनातून नियमित करा
ऐरोलीजवळीलमुंबईचेप्रस्तावितडम्पिंगग्राऊंडरद्दकरा

केंद्र सरकारने मेक इन इंडिया आणि राज्य सरकारने मेक इन महाराष्ट्राची घोषणा केली आहे. यामधून औद्योगिक गुंतवणूक येईलही परंतु, ज्यांच्या त्यागामधून हे प्रकल्प उभे राहतील, त्या प्रकल्पग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबातील तरुणांना जास्तीत जास्त नोकर्या या प्रकल्पांमधून मिळायला हव्यात, त्यांना योग्य न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकारने शाश्‍वत भूमिका घेण्याची गरज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केली आहे.


___________________________________________________________________________________________________________
दक्षिण नवी मुंबईप्रमाणेच नवी मुंबई पालिका क्षेत्रातही विकासप्रकल्प राबवावेत
आमदारसंदिपनाईकयांचीमागणी

सिडकोचे संपूर्ण लक्ष हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दक्षिण नवी मुुंबईच्या विकासाकडे आहे. मात्र ज्यांच्या त्यागातून हे शहर वसले आहे त्यांचा सिडकोला विसर पडला आहे, अशी खंत व्यक्त करीत आमदार संदीप नाईक यांनी दक्षिण नवी मुंबईप्रमाणेच नवी मुंबई पालिका हददीतही सिडकोने विकास प्रकल्प राबवावे, अशी आग्रही मागणी केली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज २०१६-२०१७च्या नगरविकास आणि गृह विभागाच्या मागण्यांवर बोलताना आमदार नाईक यांनी स्मार्ट सिटी योजनेवरही आपली अभ्यासपूर्ण मते मांडली.

___________________________________________________________________________________________________________
नियमनमुक्त शेतमाल बाजार समितीत आणण्यास मनाई नाही - आ. संदीप नाईक यांच्या प्रश्‍नाला सहकार मंत्र्यांचे उत्तर
कोणताही नियमनमुक्त शेतमाल बाजार समितीत आणण्यास मनाई नाही, अशी माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली. नियमनमुक्त व्यापारामुळे बाजार समितीमधील माथाडी आणि इतर घटकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळण्याची भिती ऐरोली मतदार संघाचे आमदार संदीप नाईक यांनी आज तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून शासनाकडे व्यक्त केली. या प्रश्‍नाला सहकारमंत्री पाटील यांनी उत्तर दिले.

___________________________________________________________________________________________________________
अगोदर प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा बॅकलॉग भरा - आ. संदीप नाईक यांच्या एमआयडीसीला सूचना
राज्य शासनाने आयटी टाऊनशीप विकास धोरण आखले असून हे धोरण राबविण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) दिली आहे. राज्यातील इतर एमआयडीसीच्या तुलनेत नवी मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे हे धोरण राबवत असताना येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराचा विचार व्हावा, शहर विकसित होत असताना प्रकल्पग्रस्तांना नोकर्‍या मिळाल्या नाहीत, प्रथम हा बॅकलॉग भरा, अशी सूचना आमदार संदीप नाईक यांनी एमआयडीसीला केली आहे....

___________________________________________________________________________________________________________
ऐरोली नजिक मुंबईच्या डंम्पिंगचे संकट टळले
आमदार संदीप नाईक यांच्या तिव्र विरोधानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

ऐरोली नजिक ३२.७७ हेक्टरवर मुंबईचे डंम्पिंग ग्राउंड उभारण्यास ऐरोली मतदार संघाचे आमदार संदीप नाईक यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत तिव्र विरोध केला. आमदार नाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोली जवळ डंम्पिंगसाठी परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले. आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईकरांवरील डंम्पिंगच्या दुर्गंधीमुळे निर्माण होणारे संभाव्य मोठे संकट टळले आहे.

___________________________________________________________________________________________________________
‘जनसंवाद’मुळे घणसोली सेक्टर ८ मध्ये आधुनिक पथदिवे
आ. संदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

घणसोली सिडको नोड हा विकसीत होणारा नोड असून या ठिकाणी सर्वांत उंच इमारती आहेत. ऐरोली आणि घणसोलीला जोडणारा पामबीच सारखा रस्ता देखील आहे, या घणसोली पामबीच मार्गावर अनेक नागरिक हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून चालत असतात तसेच व्यायाम देखील करत असतात, यामुळे या मार्गावर
नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावर सिडकोच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारच्या सोयी सुविधा करण्यात ....
________________________________________________________________________________________________________________________
अग्निशमन दलात अत्याधुनिक ‘रेस्न्यू’दाखल
नवीमुंबईअग्निशामकदलाचीमानउंचावली

महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने नेरुळ येथील वंडर्स पार्क येथे आयोजित दहाव्या झाडे, फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन तसेच उद्यान स्पर्धेचे उदघाटन ऐरोलीचे आमदार संदीप नाईक,महापौर सुधाकर सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमापुर्वी अग्निशमन केंद्राच्या रेसक्यू अशा अद्यावत गाडीचे देखील उद्दाटन झाले.
________________________________________________________________________________________________________________________
लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवजयंती निमित्त
सानपाडा येथे क्रिडा महोत्सव उत्साहात

श्री सेवा प्रतिष्ठान अंतर्गत सानपाडा यांच्यावतीने आयोजित क्रिडा महोत्सव २०१६ अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवजयंती निमित्त आयोजित या महोत्सवास राष्ट्रवादी कॉंगे्रसचेप्रदेश सरचिटणीस डॉ. संजीव गणेश नाईक, आ. संदीप नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली व खेळाडूंनाप्रोत्साहित करतानाच त्यांचे अभिनंदन केल
.

________________________________________________________________________________________________________________________

नवी मुंबईतील स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या रिक्षा परवान्यांसाठी विधानसभेत आवाज उठविणार आमदार संदीप नाईक यांची माहिती
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांची घेतली भेट

रिक्षा परवान्यांसाठी अलिकडेच काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये नवी मुंबईतील स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त अर्जदारांवर अन्याय झाला असून त्यांना रिक्षा परवाने मिळाले पाहिजेत याकरिता विधानसभे
.

________________________________________________________________________________________________________________________
सिडको एमडी संजय भाटिया आणि आमदार संदीप नाईक यांच्या बैठकीत
नवी मुंबईतील अनेक प्रलंबित विषयांची तड

आमदार संदीप नाईक यांनी आज सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांची भेट घेतली. या बैठकीत नवी मुंबईतील अनेक प्रलंबित आणि जिव्हाळयाच्या विषयांची तड लागली आहे. अतिशय सकारात्मक वातावरणात ही बैठक आज मुंबई येथील सिडकोचे मुख्यालय निर्मल भवनात झाली.
________________________________________________________________________________________________________________________
विद्युत अपघातांचे धोके टाळण्यासाठी विद्यार्थीदशेतच जागृती गरजेची
आमदार संदीप नाईक यांचे मत

रस्त्यावर होणारे अपघात नागरिकांच्या लक्षात येतात. पण विद्यूत उपकरणे हाताळताना होणारे अपघात कोणाच्याही लक्षात येत नाहीत. या विद्यूत रोषणाईच्या जमान्यात विद्यूत उपकरणांचे धोके टाळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या ठाणे कार्यालयाच्या वतीने बोनकोडे येथील रा.फ. नाईक शाळेत विद्युत हाताळणी विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार संदीप नाईक यांनी प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित राहून उपस्थित विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.