प्रत्येकाने एक तरी झाड लावावे
आमदार संदीप नाईक यांचे पर्यावरणदिनी आवाहन
प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावून ते जगवावे आणि पर्यावरण रक्षणात आपला हातभार लावावा, असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांना केले.
आमदार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन होप या स्वयंसेवी संस्थेने नवी मुंबईत निसर्ग संवर्धन आणि वृक्षारोपणाची मोठी मोहिम उभी केली आहे. ग्रीन होप, ऐरोली सेक्टर १९ मधील नेवा गार्डन रहिवासी, हरिओम जॉगर्स ग्रुप आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेवा गार्डन येथे आमदार नाईक यांच्या हस्ते पर्यावरणदिनाचेऔचित्य साधून खारफुटीचे रोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.  त्याप्रसंगी आमदार नाईक यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्व विषद केले.
या कार्यक्रमास आमदार संदीप नाईक यांच्या समवेत नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, नरेंद्र कोटकर, दिपक पाटील, हिरामण नाईक, ऍड. दत्ता घोलप, मंगेश खांडके, जयश्री

पाटील, जयश्री सोनावणे, गोरखनाथ कोटकर, रवि म्हात्रे, माधुरी परदेसी, राजाराम धनावडे, प्रकाश देसाई, शांताराम यादव, संदीप कळंभे, राजू बावदाने, अनिल नाकते, राजेश शेट्टी,डॉ. संजय सिंग, आनंद नंदुरकर, सुरेश सागळे, आनंद चव्हाण, प्रकाश मंत्री, राम पाटील, सुर्वे काका, वनविभागाचे अधिकारी सीमा आडगावकर, गायकवाड  आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.