‘जनसंवाद’मुळे घणसोली सेक्टर ८ मध्ये आधुनिक पथदिवे
आ. संदीप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

घणसोली सिडको नोड हा विकसीत होणारा नोड असून या ठिकाणी सर्वांत उंच इमारती आहेत. ऐरोली आणि घणसोलीला जोडणारा पामबीच सारखा रस्ता देखील आहे, या घणसोली पामबीच मार्गावर अनेक नागरिक हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून चालत असतात तसेच व्यायाम देखील करत असतात, यामुळे या मार्गावर
नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावर सिडकोच्या माध्यमातून कोणत्याच प्रकारच्या सोयी सुविधा करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे . मागील महिन्यात जनसंवाद कार्यक्रमात अनेक नागरिकांनी या रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावण्यासाठी मागणी केली केली होती.

त्यानुसार वेळ न घालवता सिडकोच्या अधिकार्‍यांची तातडीची बैठक बोलावून एक महिन्याच्या आत हे पथदिवे लावण्याच्या सूचना आ. संदीप नाईक यांनी अधिकार्‍यांना केल्या. त्यानुसार एक महिन्याच्या आत मध्ये सिडकोच्या माध्यमातून या ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपाचे पथदिवे लावण्यात आले आहेत, असे मनोगत आमदार संदीप नाईक यांनी घणसोली से ८ मध्ये सिडकोच्या वतीने लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले .
घणसोली नोड सिडकोने तयार केला, परंतु आवश्यक असणार्‍या सर्वच सोयींपासून नागरिकांना वंचित ठेवण्यात आले, यामध्ये रस्ते, पदपथ गार्डन, पथदिवे, पाणी पुरवठा, मलनिस्सारण वाहिनी, अशा अनेक मुलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित ठेवले आहे. शिवाय सिडको घणसोली नोड हा महापालिकेकडे हस्थांतरित करीत नसल्याने अनेक कामे ही रखडलेली आहे. अशा अनेक समस्यांविषयी आमदार संदीप नाईक यांच्या जनसंवाद या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी समस्या मांडल्या होत्या त्यावेळी घणसोली फेडरेशन से १५ चे अध्यक्ष अरुण
ठाकूर आणि गजानन जाधव यांनी आमदार संदीप नाईक यांच्याकडे से ८ करिता पथदिव्यांची मागणी केली होती, तसेच प्रभाग क्र. ३३ च्या नगरसेविका सीमा गायकवाड व स्वीकृत नगरसेवक घनश्याम मढवी यांच्याकडे देखील मागणी केली होती. नागरिकांच्या ह्या समस्येकडे लक्ष देत सिडकोच्या विद्युत विभागाने अवघ्या एक महिन्याच्या आत पथदिवे लाऊन नागरिकांना मोठा दिलासा दिला असल्याची माहिती नगरसेविका सीमा गायकवाड यांनी दिली. तसेच याविषयी नगरसेवक घनश्याम मढवी यांनी सांगितले, घणसोली सेक्टर हे विकसित होत असून या ठिकाणी कोणत्याच पायाभूत सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पामबीच मार्गावर रात्रीच्या वेळी लाईटची सिविधा नसल्याने अनेक वेळा गुन्हे देखील झाले आहे आहेत ,नागरिकांच्या या समस्या लक्षात घेता आमदार संदीप नाईक यांनी सिडको अधिकार्‍यांशी चर्चा करून ताबडतोब अत्याधुनिक स्वरूपाचे स्ट्रीट लाईट लावल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रमप्रसंगी स्थानिक नगरसेविका सीमा गायकवाड, नगरसेवक घनश्याम मढवी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन म्हात्रे, अरुण ठाकूर, गजानन जाधव, माजी नगरसेवक हरीश वाघमारे, चंद्रकांत म्हात्रे, जय म्हात्रे, प्रशांत रानकर, गोरखनाथ आगोणे, प्रवीण पाटील, सुनील म्हात्रे, निर्मला रानकर, नारायण रानकर, रेखा म्हात्रे, निर्मला राठोड मच्छिंद्र म्हात्रे, विनायक मढवी, शिवराज मढवी, गौरव म्हात्रे, सुषमा देशमुख, आनंदा तरटे, युवराज अवघडे, रुपेश म्हात्रे, उमेश सोनकांबळे, वैभव केणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.