अग्निशमन दलात अत्याधुनिक ‘रेस्न्यू’दाखल
नवीमुंबईअग्निशामकदलाचीमानउंचावली

महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने नेरुळ येथील वंडर्स पार्क येथे आयोजित दहाव्या झाडे, फळे, फुले, भाजीपाला प्रदर्शन तसेच उद्यान स्पर्धेचे उदघाटन ऐरोलीचे आमदार संदीप नाईक,महापौर सुधाकर सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमापुर्वी अग्निशमन केंद्राच्या रेसक्यू अशा अद्यावत गाडीचे देखील उद्दाटन झाले.

यावेळी त्यांच्या समवेत स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के,सभागृह नेते जयवंत सुतार,स्थानिक नगरसेवक. रविंद्र इथापे, क्रीड़ा सभापती प्रकाश मोरे, आरोग्य सभापती पुनम पाटील, नगरसेवक शशिकांत राऊत,मा.नगरसेविका सुरेखा इथापे, नगरसेविका शिल्पा कांबळी, मनपाचे अधिकारी आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित
होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर मान्यवरांनी सदर प्रदर्शनीला भेट देवून आढावा घेतला. तीन दिवस आयोजित या प्रदर्शनामध्ये एकूण ३५० संस्थांनी सहभाग घेतला आहे.