विद्युत अपघातांचे धोके टाळण्यासाठी विद्यार्थीदशेतच जागृती गरजेची
आमदार संदीप नाईक यांचे मत

रस्त्यावर होणारे अपघात नागरिकांच्या लक्षात येतात. पण विद्यूत उपकरणे हाताळताना होणारे अपघात कोणाच्याही लक्षात येत नाहीत. या विद्यूत रोषणाईच्या जमान्यात विद्यूत उपकरणांचे धोके टाळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या ठाणे कार्यालयाच्या वतीने बोनकोडे येथील रा.फ. नाईक शाळेत विद्युत हाताळणी विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार संदीप नाईक यांनी प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित राहून उपस्थित विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.

दररोज नवीन विद्युत उपकरणे व साधने बाजारात मेत आहेत आणि दिवसेंदिवस आपले जीवनमान सुसह्य करण्मासाठी मा उपकरणांवर अधिकाधिक अवलंबून राहत आहोत. तसेच विद्युत अपघातात जीवितहानी होण्माचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. दरवर्षी अनेक व्मक्ती विद्युत अपघाताने दगावतात. शॉर्टसर्किटमुळे लागणार्‍मा आगीत कोट्यवधीच्मा मालमत्तेचे नुकसान होते. मातील बहुतेक सर्व अपघातांचे कारण अज्ञान, बेफिकीरी किंवा फाजील आत्मविश्वास मापैकी एक असल्माचे आढळून येतेे.
असे विद्युत अपघात कमी होऊन नागरिकांचे जीव वाचावेत व शॉर्टसर्कीटमूळे लागणार्‍या आगीमुळे कोट्यावधींचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थीदशेत असतानाच उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या ठाणे कार्यालयाच्या वतीने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राची सुरूवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सुरवातीला सहाय्यक विद्युत निरीक्षक चंद्रकांत थोरात यांनी प्रास्ताविक केले. तर शाखा अभियंता भूषण मानकामे यांनी माहितीपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यूत हाताळणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आमदार संदीप नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यूत हाताळणी बाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, विद्यूत उपकरण हाताळणे हे चर्चासत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवावे की, लोकांमध्ये विद्यूत हाताळणीबाबत जनजागृती होऊन यापासून होणारे अपघात शून्य व्हावेत, मुले खेळता-खेळता जिज्ञासेपोटी विद्यूत उपकरणांना हात लावतात आणि संभाव्य अपघाताला बळी पडतात, हे थांबायला हवे. या चर्चासत्रासाठी श्रमिक शिक्षण संस्थेचे सचिव सुरेश नाईक, मुख्याध्यापक सुधीर थळे, उपमुख्याध्यापक आंधळे सर, समन्वयक नरेंद्र म्हात्रे, शाखा अभियंता अनिल शिंदे व राजू पाडवी आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास मेहेतर यांनी केले.