दक्षिण नवी मुंबईप्रमाणेच नवी मुंबई पालिका क्षेत्रातही विकासप्रकल्प राबवावेत
आमदारसंदिपनाईकयांचीमागणी

सिडकोचे संपूर्ण लक्ष हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दक्षिण नवी मुुंबईच्या विकासाकडे आहे. मात्र ज्यांच्या त्यागातून हे शहर वसले आहे त्यांचा सिडकोला विसर पडला आहे, अशी खंत व्यक्त करीत आमदार संदीप नाईक यांनी दक्षिण नवी मुंबईप्रमाणेच नवी मुंबई पालिका हददीतही सिडकोने विकास प्रकल्प राबवावे, अशी आग्रही मागणी केली आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज २०१६-२०१७च्या नगरविकास आणि गृह विभागाच्या मागण्यांवर बोलताना आमदार नाईक यांनी स्मार्ट सिटी योजनेवरही आपली अभ्यासपूर्ण मते मांडली.
पालिका क्षेत्रावर अन्याय नको..

दक्षिण नवी मुंबईचा विकास सिडको स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करणार आहे. त्याकरीता सिडकोने ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दक्षिण नवी मुंबईचा १००टक्के विकास होणार असेल तर पालिका क्षेत्रात कोणताही विकास न करणे हे पालिका क्षेत्रासाठी अन्यायकारक ठरेल, असे आ.नाईक यांनी स्पष्ट केले.

दळणवळणाच्या बाबींकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज...
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यानंतर निश्‍चितच मुंबईवरील हवाई वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. परंतु विमानतळानजिक असलेल्या नवी मुंबई शहरावर वाहतुकीचा ताण पडणार आहे. त्यामुळे येथील रस्ते, उडडाणपूल आदी दळणवळणाच्या बाबींकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आमदार नाईक यांनी व्यक्त केली. दक्षिण नवी मुंबईत उभारण्यात येणार्या विकास प्रकल्पांच्या प्रमाणात २५टक्के प्रकल्प तरी पालिका क्षेत्रात निर्माण करावेत, अशी सुचना आमदार नाईक यांनी केली. प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के भुखंड आणि महापालिकेकडे सुविधा भुखंड सिडकोकडून लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी केली.

लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत...
स्मार्ट सिटी योजनेवर बोलताना आमदार नाईक म्हणाले की या संकल्पनेची स्पष्टता अजुनही झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोप्रतिनिधींचे करविषयक अधिकार अबाधित राहिले पाहिजेत, असे मत त्यांनी मांडले.

पोलीस दलाची संख्या वाढवा..
गृह विभागावरील मागण्यांवर चर्चेत भाग घेताना आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईत पोलीस दलाची संख्या वाढविण्याची मागणी केली. नवी मुंबई शहराचा विकास होतो आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ येवू घातले आहे. मोठे औद्योगिक क्षेत्र आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्यामुळे येथील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. या संबधीचा प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहे तो मंजुर करावा.

हस्तगत मुददेमाल आणि गाडया ठेवण्यासाठी भुखंड हवा..
विविध प्रकरणांमध्ये पोलीस मुददेमाल हस्तगत करतात किंवा गाडया जप्त करीत असतात. हा माल पोलीस ठाण्यांच्या आवारातच ठेवलेला असतो. त्यामुळे या पोलीस ठाण्यांना डंप्मिंग ग्राउंडचे स्वरुप आलेले असते. हा सर्व माल मध्यवर्ती ठिकाणी ठेवण्याकरीता विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून भुखंड आरक्षित करण्याची मागणी देखील त्यांनी केली. या कामासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा उभी करायला हवी, असे मत मांडले.

सीसीटिव्हीसाठी अर्थसहाय द्यावे...
शहरांमध्ये विविध स्थानिक प्राधिकरणांच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नवी मुंबईत पालिका आणि सिडकोेने सीसीटिव्ही कॅमेरे बसविले असले तरी ज्या ठिकाणी ते लावण्यात आले नाहीत आणि ज्या ठिकाणी त्यांची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी सीसीटिव्ही लावण्यासाठी शासनाने अर्थसहाय करावे, अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी केली आहे.

कोस्टल रोडची मागणी...
नवी मुंबईतील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईमधून ठाणे-ऐरोली-मुंबई कोस्टल रोड बांधण्याची गरज आमदार संदिप नाईक यांनी नगरविकास खात्यावरील चर्चेत भाग घेताना व्यक्त केली. हा कोस्टल रोड निर्माण करण्याची मागणी केली.

प्रक्रीयाकृत पाण्याचा वापर उद्योगांसाठी...
राज्यात पाणी टंचाईची परिस्थिती आहे. उद्योगधंदे आहेत मात्र त्यांना उत्पादनासाठी पाणी मिळत नाही त्यामुळे त्यांच्यावर संकट कोसळले आहे. अशा परिस्थीतीत जर उद्योगधंद्यांसाठी प्रक्रीयाकृत पाण्याचा वापर एमआयडीसीने केला तर शुध्द पाण्याचा पुरवठा कारखान्यांना करावा लागणार नाही. हे शुध्द पाणी पिण्यासाठी पुरवठा करता येवू शकेल, अशी सुचना आमदार संदिप नाईक यांनी उद्योग विषयक मागण्यांवर चर्चा करताना केली होती. या सूचनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात उत्तर दिले. प्रक्रीयाकृत पाण्याचा वापर उद्योगधंद्यांसाठी करण्याच्या सुचना एमआयडीसीला देणार असल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले.