प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठीआमदार संदीप नाईक यांचे आंदोलन
नवीमुंबईबंदचाआवाजविधानभवनातकेलाबुलंद

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी आमदार संदीप नाईक हे विधानसभेत सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सिडको आणि महापालिका प्रकल्पग्रस्तांच्या वडीलोपार्जीत बांधकामांवर करीत असलेल्या कारवाईविरोधात सोमवारी प्रकल्पग्रस्त आणि इतर घटकांनी शहरात कडकडीत बंद पाळला. सोमवारीच राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनही सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नी आक्रमक आंदोलन करीत त्यांना न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली.विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आमदार नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचे बॅनर फडकविले. प्रकल्पग्रस्तांनी पुकारलेल्या बंदचा आवाज त्यांनी विधीमंडळात बुलंद केला. या बंदला आमदार नाईक यांनी अगोदरच पाठींबा दिला होता.
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली बांधकामे तात्काळ नियमित करावीत त्याचबरोबर ग्रामस्थांच्या सुचनांचा अंतर्भाव करुन गावठाण विस्तार योजनेचा जी.आर. तात्काळ प्रसिध्द करावा, अशी मागणी या आंदोलनादरम्यान आमदार नाईक यांनी केली. गावठाणांची हदद निश्‍चित न करता सिडको आणि महापालिका प्रकल्पग्रस्तांच्या वडीलोपार्जीत आणि गरजेपोटीच्या बांधकामांवर कारवाई करीत आहे, ही कारवाई विनाविलंब थांबवावी, या मागणीकडे देखील त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासनाने मान्य करुन त्यांना न्याय द्यावा यासाठी शासकीय पत्रव्यवहार, मंत्रयांच्या भेटीगाठी, तारांकीत प्रश्‍न, लक्षवेधी सुचना इत्यादींच्या माध्यमातून विधानसभेत आमदार नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अविरत पाठपुरावा केला आहे.