नवी मुंबईत कबड्डीच्या स्टेडियमसाठी प्रयत्नशील -आमदारसंदीपनाईक
देशी खेळ असलेल्या कबडडीच्या सरावासाठी तसेच सामन्यांच्या आयोजनासाठी खास स्टेडियम निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती नवी मुंबई कबड्डी लीगचे अध्यक्ष आमदार संदीप नाईक यांनी दिली आहे. सलग दुसर्‍या वर्षी नवी मुंबईत नवी मुंबई कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने १३ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात सायंकाळी ५ ते रात्री ११ यावेळेत करण्यात आले आहे. या वर्षी पुरुषांचे एकूण ८ संघ असून दोन संघांची यावर्षी वाढ झाली आहे. यंदा प्रथम महिलांचे ४ संघ नव्याने सहभागी झाले आहेत. ा स्पर्धेचा शुभारंभप्रसंगी उदघाटक म्हणून आमदार नाईक बोलत होते. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष देवराम

भोईर प्रमुख अतिथी होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, नवी मुंबई पालिकेचे क्रीडा समितीचे सभापती लिलाधर नाईक, प्रो कबडडीचे स्टार खेळाडू काशिलिंग अडके, रोहित राणा, माया आकरे, संघमालक नगरसेवक घनश्याम मढवी, नगरसेविका संगीता म्हात्रे, समाजसेवक राजेश मढवी, राष्ट्रवादी वॉर्ड ४० अध्यक्ष कोपरखैरणे शरद पाटील, समाजसेवक वशिष्ट यादव, समाजसेवक डेव्डिड किथ, समाजसेवक सुरेश उर्फ दाजी सणस, समाजसेविका स्नेहाली आंबोकर(म्हात्रे), नगरसेविका लता मढवी, नगरसेविका वैशाली नाईक, समाजसेविका शुभांगी संकपाळ, समाजसेविका रेश्मा दळवी, नगरसेविका सीमा गायकवाड, नगरसेविका कविता आगोंडे, हनुमंत दळवी, संदीप म्हात्रे, वासुदेव पाटील, नारायण शिंदे, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेशदादा नाईक, रा.फ.नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर थळे, एफ.जी.नाईक कॉलेजचे प्राचार्य प्रताप महाडिक, आशा शेगदार, प्रशिक्षक मयूर पालांडे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार नाईक म्हणाले की, प्रो कबड्डीच्या माध्यमातून कबडडीला चांगले दिवस आले आहेत.
या खेळाच्या माध्यमातून खेळाडूंनी देशाचे नाव मोठे करावे. कबड्डीसारख्या मैदानी खेळातून स्थानिक खेळाडूंना चांगले व्यासपिठ मिळवून देण्यासाठी नवी मुंबई कबड्डी लिगची सुरुवात केली आहे. या स्पर्धेत खेळण्याचा आनंद घ्या. जय किंवा पराजय महत्वाचा नसून आपली कामगिरी चांगली करा, असे आवाहन त्यांनी खेळाडूंना केले.