कबडडीसाठी स्वतंत्र मैदाने उपलब्ध करणार
आमदार संदीप नाईक यांची ग्वाही
नवीमुंबईकबडडीलिगचेदणक्यातउदघाटन

आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते आज बहुचर्चित नवी मुंबई कबडडी लिगचे एका नेत्रदिपक सोहळयात उदघाटन झाले. कबडडी खेळासाठी आणि स्पर्धेकरीता नवी मुंबईत स्वतंत्र मैदाने उपलब्ध करु, अशी ग्वाही लिगचे अध्यक्ष आमदार संदीप नाईक यांनी दिली.कोपरखैरणेच्या सेक्टर ८मधील रा.फ.नाईक विद्यालयाच्या मैदानात जिल्हा कबडडी असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा १७ एप्रिलपर्यंत रोजी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत रंगणार आहेत. लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत नवी मुंंबई क्रीडा संकुलाच्या माध्यमातून क्रीडाविषयक उपक्रम राबवित

असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यात यश आले. कबडडी लिगच्या आयोजनामागे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणे हेच उददीष्ट असल्याचे आमदार नाईक म्हणाले. या वर्षी लिगमध्ये ६ संघ सहभागी झाले आहेत पुढच्या वर्षी किमान १० संघ सहभागी होतील, असा विश्‍वास व्यक्त केला. अभिलाषा म्हात्रे सारखी आंतरराष्ट्रीय कबडडीपटू नवी मुंबईत राहते. प्रो कबडडी लिग स्पर्धेतील पुणे वॉरियर्स संघाचे प्रशिक्षक अशोक शिंदे नवी मुंबईत राहतात याचा अभिमान आहे. या अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन शहरतील गुणवान खेळाडूंना मिळू शकेल, असे आ. नाईक म्हणाले. नवी मुंबई कबडडी लिगमध्ये संघ मालकांनी विश्‍वास दाखविल्याबददल त्यांचे अभिनंदन केले.
कबडडी लिगमध्ये कोपरखैरणे किंग्स, वाशी रायडर्स नेरुळ रायडर्स, सानपाडा स्टार्स, ऐरोली स्ट्रायकर्स आणि बेलापूर ब्रेकर्स असे संघ सहभागी आहेत. त्यांचे संघमालक अनुक्रमे समाजसेविका स्नेहाली आंबोरकर-म्हात्रे, नगरसेवक घनश्याम मढवी, समाजसेवक प्रभाकर म्हात्रे,नगरसेवक शंकर मोरे, समाजसेवक राजेश मढवी, समाजसेवक वैशिष्ठ यादव असे आहेत.
उदघाटन सोहळयास पालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती प्रकाश मोरे, युवक समितीचे सभापती गिरीश म्हात्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केशव म्हात्रे, लिगचे उपाध्यक्ष एफ.जी. नाईक कॉलेजचे प्राचार्य प्रताप महाडीक, पुणे वॉरियर्स कबडडी संघाचे प्रशिक्षक अशोक शिंदे, , श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेशदादा नाईक, यांच्यासह नगरसेवक लिलाधर नाईक, नगरसेविका वैशाली नाईक, नगरसेविका लता मढवी, समाजसेवक भालचंद्र मढवी, दिपक पाटील, पराग पाटील, जयेश कोंडे, मिलिंद जाधव, विठठल बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.