घरे तोडतात ते मने काय जोडणार
आमदार जितेंद्र आव्हाड यांचा विरोधकांवर घणाघात

आपल्या हस्तकांकरवी सर्वसामान्यांची घरे तोडण्यासाठी न्यायालयात जाणारे जनतेची मने काय जोडणार? असा जोरदार घणाघात करीत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक ६ यादवनगरच्या पोटनिवडणुकीच्या आजच्या प्रचारसभेत विरोधकांचे पुरते वस्त्रहरण केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार संध्या यादव यांच्या प्रचार सभेत आज स्थानिक रहिवाशांनी तुफान गर्दी केली होती.

आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, महिला जिल्हाअध्यक्षा माधुरी सुतार, माजी नगरसेवक रामआशिष यादव, उमेदवार संध्या यादव राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.दिघ्यातील बांधकामे मोरबे धरण विकत घेण्याचा दुरदर्शी निर्णय घेतल्याने नवी मुंबईत पाण्याची समस्या नसल्याचे ते म्हणाले. दिघ्यातील गरीबांची घरे माणुसकीच्या दृष्टीकोणातून वाचविण्यासाठी आमदार नाईक आणि आम्ही विधानसभेत आवाज उठविला. सरकारला धोरण तयार करण्यास लावले आता याचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधक करीत असल्याची टिका आमदार विद्या चव्हाण यांनी केली. मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि इतर ज्या शहरांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे त्यांची पुरती वाट लागल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे नवी मुंबई हे सुंदर शहर असून सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी असल्याचे त्या म्हणाल्या. परप्रांतीयांच्या रिक्षा जाळा, असा फतवा मनसेने मध्यंतरी काढला होता. मात्र परप्रांतियच नवी मुंबईत नागरिकांना रिक्षा प्रवासाची सुविधा मोठया प्रमाणावर देत असल्याचे त्या म्हणाल्या. तुम्हाला कुणी धमकावले तर घाबरुन जावू नका, राष्ट्रवादी कॉग्रेस तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत गेल्याचे त्या म्हणाले. एकही भूल कमल का फुल, अशी जनतेची भावना असल्याचे सांगितले. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास डॉ.नाईक यांनी व्यक्त केला. प्रभागाचा विकास केल्याने येत्या १७ एप्रिल रोजी नागरिक संध्या यादव यांना बहुमतांनी निवडून देतील, असे ते म्हणाले. मोरबे धरण विकत घेण्याचा दुरदर्शी निर्णय घेतल्याने नवी मुंबईत पाण्याची समस्या नसल्याचे ते म्हणाले. दिघ्यातील गरीबांची घरे माणुसकीच्या दृष्टीकोणातून वाचविण्यासाठी आमदार नाईक आणि आम्ही विधानसभेत आवाज उठविला. सरकारला धोरण तयार करण्यास लावले आता याचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधक करीत असल्याची टिका आमदार विद्या चव्हाण यांनी केली. मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि इतर ज्या शहरांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे त्यांची पुरती वाट लागल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे नवी मुंबई हे सुंदर शहर असून सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी असल्याचे त्या म्हणाल्या. परप्रांतीयांच्या रिक्षा जाळा, असा फतवा मनसेने मध्यंतरी काढला होता. मात्र परप्रांतियच नवी मुंबईत नागरिकांना रिक्षा प्रवासाची सुविधा मोठया प्रमाणावर देत असल्याचे त्या म्हणाल्या. तुम्हाला कुणी धमकावले तर घाबरुन जावू नका, राष्ट्रवादी कॉग्रेस तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत गेल्याचे त्या म्हणाले. एकही भूल कमल का फुल, अशी जनतेची भावना असल्याचे सांगितले. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास डॉ.नाईक यांनी व्यक्त केला. प्रभागाचा विकास केल्याने येत्या १७ एप्रिल रोजी नागरिक संध्या यादव यांना बहुमतांनी निवडून देतील, असे ते म्हणाले.