ग्रीन होप संस्थेच्यावतीने पर्यावरणदिनी वृक्षारोपण
पर्यावरण संरक्षणाची घेतली शपथ

ग्रीन होप या पर्यावरणप्रेमी संस्थेच्यावतीने जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने सोमवारी शहरात तीन ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या सदस्यांनी आणि नागरिकांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
कोपरखैरणेतील निसर्गउद्यान परिसरात वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे


जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, पालिकेतील सभागृहनेते जयवंत सुतार, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सुरज पाटील, ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र इथापे, पालिकेच्या क्रीडा समितीचे सभापती लिलाधर नाईक, नगरसेविका शशिकला पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजू शिंदे, दाजी सणस, नितिन म्हात्रे, नारायण शिंदे, आत्माराम पाटील, हनुमान दळवी, मुख्याध्यापक सुधीर थळे, प्राचार्य प्रताप महाडिक, सचिन तिकोणे, रॉबिन मढवी, मारुती सकपाळ, गणेश शिंदे, पालिकेचे प्रभाग अधिकारी अशोक मढवी आदी मान्यवर तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महापौर सोनावणे यांनी उपस्थितांना पर्यावरण रक्षणाप्रती कटीबध्द राहण्याची शपथ दिली. जांभूळ, लिंब, सावली देणारी झाडे अशा जातीच्या वृक्षरोपांचे रोपण याठिकाणी करण्यात आले.
ऐरोलीच्या समतानगर येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, स्थानिक नगरसेविका शशिकला सुतार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जब्बार खान, सेवादलाचे अध्यक्ष दिनेश पारेख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष राजेश मढवी, वॉर्ड अध्यक्ष अनिल नाकते, हिरामन राठोड, नरेंद्र कोटकर, पालिकेच्या विभाग अधिकारी अंबाते तसेच स्थानिक पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत ग्रीन होपच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले.
करावे येथे ग्रीन होप संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमास महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, पालिकेतील सभागृहनेते जयवंत सुतार, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र इथापे, नगरसेवक विनोद म्हात्रे, नगरसेवक गणेश म्हात्रे, राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष गणेश भगत, नगरसेविका नेत्रा शिर्के, नगरसेविका रुपाली किस्मत भगत, माजी नगरसेवक संदीप सुतार आदींच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.