ऐरोलीतील जैवविविधता केंद्राला जागतिक दर्जाचे बनवा

महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ऐरोली दिवा खाडीनजीक विकसित करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या सागरी व किनारी जैव विविधता केंद्राचे उद्घाटन रविवारी पार पडले. याप्रसंगी आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, कांदळवन विभागाचे मुख्य संवर्धक एन. वासुदेवन, वन विभागाचे सचिव विकास खरगे, ए के मिस्त्री, ज्यांच्या सल्ल्याने या केंद्राची निर्मिती करण्यात आली त्या जर्मन कंपनीचे जीआयएफचे मुख्य अधिकारी मायकेल वकिली, कांदळवन संरक्षक अधिकारी मधुकर घोडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कंदळवनाचे संरक्षण व संधारण , तसेच सागरी किनारपट्टीवरमेणारे पशुपक्षी मांच्माविषमी माहिती देणार्‍मा ज्वेल्स ऑफ ठाणे क्रीक मा सी.डी.चे प्रकाशन तसेच स्लाइस ऑफ एमरल मा पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्मात आले.आपल्मा मनोगतात मंत्री मुनगंटीवार मांनी सांगितले की, या जैवविविधता केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सागरी संस्कृती जपण्माचे काम वन विभागाने केले आहे. मा पर्मटन स्थळाला जागतिक दर्जा प्राप्त होण्मासाठी सरकार कडून वनविभाग आणि कांदळण विभागाला जी रक्कम लागेल ती आपण देऊ.

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना या केंद्राचे मोफत दर्शन घेण्यासाठी परवानगी द्या, अशी सूचना करुन मंत्री मुनगंटीवार यांनी शहरातील अशुद्ध पाणी स्वच्छ करण्याचे काम सागरी किनार्‍यावर असणार्‍या वनस्पती करत असतात त्यांचे संरक्षण आणि संधारण केले पाहिजे, असे आवाहन केले.
सागरी जैव विविधता केंद्रामुळे स्थानिक मच्छीमारांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली. आमदार संदीप नाईक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ऐरोली मुलुंड ब्रीज बनत असताना दिवागावचा खाडी किनारा नष्ट होण्याची भीती वाटत होती परंतु कांदळवन हा स्वतंत्र विभाग झाल्याने या पर्यटनस्थळाचा विकास तसेच स्थानिकांना रोजगार निर्मिती उपलब्ध झाली आहे. शिवाय या जैवविविधता केन्द्राच्या माध्यमातून सागरी किनार्‍यावरील जीवसृष्टीची माहिती पर्यटकांना होईल.